पूर्वांचल एक्सप्रेसवेवर PM मोदी विमानातून दाखल; पार पडलं उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्वांचल एक्सप्रेसवेवर PM मोदी विमानातून दाखल; पार पडलं उद्घाटन

पूर्वांचल एक्सप्रेसवेवर PM मोदी विमानातून दाखल; पार पडलं उद्घाटन

sakal_logo
By
अमित उजागरे

सुलतानपूर : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलाच्या विमानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. दरम्यान, त्यांच्याच हस्ते या एक्सप्रेसवेचं उद्घाटन पार पडलं. यावेळी मोदींनी या एक्सप्रेसवेबाबत माहिती दिली. तसेच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समतोल विकासही तितकाच महत्वाचा आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

मोदी म्हणाले, जेव्हा तीन वर्षांपूर्वी पूर्वांचल एक्सप्रेसवेच्या भूमीपूजन झालं तेव्हा मी कधीही विचार केला नव्हता की, मी एके दिवशी या एक्सप्रेसवेवर विमानातून दाखल होईल. देशाचा सर्वांगीण विकासासाठी समतोल विकास होणं हे देखील तितकचं महत्वाचं आहे. काही भाग विकासाच्या रेसमध्ये पुढे निघून गेले तर काही भाग दशकांपासून विकासापासून वंचित राहणं हे एखाद्या देशासाठी योग्य आहे का?

हेही वाचा: मालेगाव हिंसाचार | "राष्ट्रवादी आणि जनता दलचा दंगलीशी संबंध नाही"

ज्यांचा उत्तर प्रदेशच्या आणि इथल्या जनतेच्या क्षमतांवर संशय आहे, त्यांनी आज तुलतानपूरला यावं आणि त्यांच्या क्षमतांचा अनुभव घ्यावा. गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी जिथं केवळ जमिनीचा तुकडा होता. तो आता एक अत्याधुनिक एक्सप्रेसवे झाला आहे, असंही मोदी उद्घाटन प्रसंगी म्हणाले.

हेही वाचा: ''आजारी मुख्यमंत्री-आजारी सरकार'', नारायण राणेंची टीका

उत्तर प्रदेशात जी सरकारं दीर्घकाळ राहिलं आणि ज्या पद्धतीचं राजकारण इथं झालं. त्यांनी उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासाकडून लक्ष दिलं नाही. उत्तर प्रदेशातील एका भागाला आणि तिथल्या लोकांना माफियांच्या आणि गरिबीच्या हवाली केलं. पण मला आनंद आहे की आज हा भाग नवा अध्याय लिहित आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

loading image
go to top