Increasing Leopard attacks near kondhavle velhe
sakal
वेल्हे : कोंढावळे खु. (ता.राजगड) येथील डोंगर परिसरात राहणारे शेतकरी रामभाऊ झिलू ढेबे हे मंगळवार (ता.२५) रोजी सायंकाळी सुमारे ४.०० वाजण्याच्या सुमारास आपल्या शेळ्यांच्या कळपासह जात असताना झुडपात लपलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात एक शेळी ठार झाली आहे. आपले पशुधन वाचवण्यासाठी रामभाऊ ढेबे यांनी आरडाओरड करत बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याने आपली शिकार सोडून झाडी-झुडपात पळ काढला. हा बिबट्या साधारण १ ते २ वर्ष वयाचा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.