
पुण्यात कोंढवा परिसरात २५ वर्षीय तरुणीनं तिच्यावर डिलिव्हरी बॉयने घरात घुसून बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली. पण आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीय. बलात्कार केल्याचा आरोप ज्याच्यावर केलाय तो तरुणीचा बॉयफ्रेंडच असल्याचं तपासात उघड झालंय. दोघांची ओळख वधु वर मेळाव्यात झाली होती. त्यांच्या कुटुंबियांचीही एकमेकांशी ओळख आहे.