Fraud News : सदनिका परस्पर गहाण ठेवून कर्ज घेतल्याप्रकरणी बिल्डरविरुध्द गुन्हा

कोंढव्यातील साईबाबानगरमधील गगन एमरल्ड सोसायटीतील सदनिकेवर परस्पर गहाणखत नोंदवून बिल्डरने कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार आला समोर.
fraud
fraudesakal

कोंढवा - कोंढव्यातील साईबाबानगरमधील गगन एमरल्ड सोसायटीतील सदनिकेवर परस्पर गहाणखत नोंदवून बिल्डरने कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी बिल्डरविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सदनिकाधारक शबाना नफीस शेख यांनी फिर्याद दिली आहे. सुशिल अगरवाल आणि घनश्याम अगरवाल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शबाना शेख ह्या गगन एमरल्ड सोसायटीत डी विंगमधील सदनिका क्रमांक ८०४ मध्ये २०१७ पासून वास्तव्यास आहेत.

ही सदनिका त्यांनी रायसोनी वास्तुशिल्प व्हेंचरतर्फे अगरवाल यांच्याकडून जून २०१७ मध्ये खरेदी केली. मात्र, एप्रिल २०२३ मध्ये एका फायनान्स कंपनीकडून त्यांच्या दरवाजावर ‘प्रतिकात्मक ताबा’ घेतल्याची नोटीस लावण्यात आली. याबाबत तक्रारदार शेख यांनी अगरवाल यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी पत्राद्वारे ही मिळकत सोडवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु २८ जून रोजी फायनान्स कंपनीने त्यांची सदनिका विक्री करण्याची प्रक्रिया सुरु केली.

त्यावर त्यांच्या मालकीच्या सदनिकेचे गहाणखत करून बिल्डरने फायनान्स कंपनीकडून कर्ज उचलून फसवणूक केली. तसेच, बिल्डरने या सदनिकेसह २८ सदनिका आणि सहा दुकानांचेही गहाणखत नोंदवून ९० कोटी ४० लाख ६१ हजार रुपयांचे कर्ज काढल्याचे नोटिशीत नमूद केल्याचे महिलने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

२०१७ मध्ये आम्ही ही सदनिका विकत घेतली आणि याठिकाणी वास्तव्यास आलो. मात्र, एप्रिल २०२३ मध्ये हा सर्व प्रकार उघडकीस आल्यास आम्ही हादरून गेलो आहोत. आयुष्याची सर्व कमाई या सदनिकेत लावली असून आमची फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणुकीविरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत आहोत. आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे.

- सलीम अन्सारी, सचिव, गगन एमरल्ड सोसायटी

आम्ही एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. याबाबत फायनान्स कंपनीसोबत बोलणे सुरू आहे. काही अडचणी होत्या. त्या आम्ही सोडवू.

- सुशील अगरवाल, विकसक

सदनिकाधारक महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इतर सदनिकाधारकांचे जबाब अद्याप नोंदवून घेतलेले नाहीत. ते जबाब नोंदवून घेतल्यानंतर नेमकी किती फसवणूक झाले हे स्पष्ट होईल. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. सर्व कागदपत्रांची शहानिशा करुन पुढील तीन-चार दिवसांत तपास सुरु होईल.

- संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com