

Police deployed in Kondhwa, Pune after minor dispute escalates into tension; security tightened to maintain law and order.
esakal
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देत पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात शुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादाला काही समाजकंटकांनी जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याने काल रात्री परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणली असून, या प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.