Wagholi News : कोपर्डी आरोपी मारहाण प्रकरणातील तिघांना वाघोलीतूनही मदत; जरांगे पाटील यांच्यावरील आरोपाचे पत्रकार परिषदेत खंडण

जरांगे पाटील हे मुंबई येथे उपोषणाला जात असताना लाखो आंदोलकांचा वाघोली मुक्कामाचा खर्च हा वाघोली, खराडी, चंदननगर, लोहगाव व परिसरातील मराठा बांधवांनी केला.
wagholi press conference
wagholi press conferencesakal

वाघोली - कोपर्डी येथील घटनेनंतर आरोपींवर झालेल्या हल्ला प्रकरणात तुरुंगवारी केलेल्या तिघांनी आम्हाला काहीच मिळाले नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेले आरोप खोटे असून काही दिवसापूर्वी वाघोली मराठा समाजाने त्यांना 51 हजार रुपये रोख मदत दिली. तसेच त्यांच्या जामिनासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठी व भरघोस मदत केल्याचे पत्रकार परिषदेत मराठा समाज बांधवांनी सांगितले.

जरांगे पाटील हे मुंबई येथे उपोषणाला जात असताना लाखो आंदोलकांचा वाघोली मुक्कामाचा खर्च हा वाघोली, खराडी, चंदननगर, लोहगाव व परिसरातील मराठा बांधवांनी केला. त्याचा सर्व हिशोब आमच्याकडे आहे. जरांगे पाटील यांच्या मागे कोणी राजकीय व्यक्ती असल्याचा व ते खर्च करीत असल्याचा दावाही पूर्णपणे खोटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोण कोणत्या राजकीय नेत्यांच्या पाठबळाने त्यांनी जरांगे यांच्यावर खोटे आरोप केले याबाबतचे फोटो त्यांनी पत्रकार परिषदेत दाखविले. वाघोली येथील मुक्कमावेळी अगदी भाकरी पासून मराठा बांधव मदतीसाठी आले. यामुळे कोणी राजकीय व्यक्ती खर्च करीत असल्याचा बिनबुडाचा आरोप करू नये.

आमच्याकडे रुपया रूपयाचा खर्च आहे. कोणाला तपासयचा असल्यास आमच्याकडे यावे. असे आवाहनही त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला ॲड शनी शिंगारे, माजी सरपंच जयश्री सातव, ज्योती सातव, सुनंदा वडजे, माधव पाटील, शेखर साळुके, बालाजी पाटील आदी मराठा बांधव उपस्थीत होते.

पैसे परत करा

मनोज जरांगे पाटील यांच्यमुळेच तिघांना समाजाने भरघोस मदत केली. मात्र कोणा राजकीय व्यक्तीकडून पैसे घेवून ते बिन बुडाचे आरोप करीत आहेत. आम्हाला त्यांची लाज वाटत आहे. मदत करण्याची त्यांची लायकी नाही. आम्ही त्यांना केलेली मदत त्यांनी परत करावी.

जरांगे पाटील यांचा जो आदेश असेल त्या नुसार या लढ्यासाठी वाघोली मराठा बांधव आंदोलन करतील. असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com