Water Tanker : सहायक पोलीस निरीक्षकांकडून कोपरे, मांडवे, मुथाळणे परीसरात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू

कोपरे, मांडवे, मुथाळणे परीसरातील नागरीकांना ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून स्वखर्चाने पाण्याचा टँकर सुरू करून समाजातील आर्थिक सधन नागरिकांपुढे एक आदर्श निर्माण केला.
Assistant Inspector of Police Sachin Kandage
Assistant Inspector of Police Sachin Kandagesakal
Summary

कोपरे, मांडवे, मुथाळणे परीसरातील नागरीकांना ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून स्वखर्चाने पाण्याचा टँकर सुरू करून समाजातील आर्थिक सधन नागरिकांपुढे एक आदर्श निर्माण केला.

ओतूर - ओतूर, ता. जुन्नर येथील पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांस कडून स्व खर्चाने कोपरे, मांडवे, मुथाळणे परीसरातील नागरीकांना ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून स्वखर्चाने पाण्याचा टँकर सुरू करून समाजातील आर्थिक सधन नागरिकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून देणे ही बहुतेक जिल्हातील पहिलीच घटना असावी. त्यांच्या या कृतीने समाजातील इतर नागरिकांना प्रेरणा तर मिळणारच आहे. मात्र, सर्व सामन्या नागरीकामध्ये पोलीस दलाची प्रतिमा ही उंचावली आहे.

कोपरे, मांडवे, मुथाळणे परीसरात ऐन उन्हाळ्यात नेहमीच पाणी टंचाई निर्माण होते. त्यात उपलब्ध पाणी हो गढूळ व हिरवे झालेले असते. त्यामुळे या परिसरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता ही आहेच. याबाबत दै. सकाळ व इतर माध्यमात बातम्या वेळोवेळी प्रकाशित होत होत्या. त्यामुळे शासनाकडून ही या भागात प्रत्येक वर्षी प्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पुरवला जातो. मात्र लोकसंख्या मोठी असल्याने ही सेवा तोकडी पडते.

ओतूर पोलीस ठाण्याचा जानेवारीत प्रभार स्वीकारलेले प्रभारी अधिकारो सचिन कांडगे यांनी ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावाना विविध घटना संबधी भेटी द्याव्या लागतात. याच दरम्यान त्यानी कोपरे, मांडवे, मुथाळणे परीसरातील पाणी टंचाई दिसून आली. तसेच प्रसार माध्यमातून व दैनिकां मधून प्रसिध्द होणाऱ्या पाणी टंचाईच्या बातम्या यामुळे त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवीत या भागात स्वखर्चाने पीण्याचा पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला.

तसेच प्रथम स्वत: टँकरबरोबर जाऊन नागरीकांना पाणी वाटप ही केले. तसेच या परीसरातील पोलीस पाटलाशी संपर्क व समन्वय साधून ज्या वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शासकीय टँकर न आल्याने झालेली पाणी टंचाई अश्या वाड्या वस्त्यावर ते पिण्याच्या पाण्याचा टँकर पाठवतात.

आतापर्यंत त्यांनी तीन पाण्याचे टँकर या भागात पाठवले असून, पोलीस पाटलांकडून माहिती घेऊन या पुढेही पिण्याच्या पाण्याचे टँकर या भागात उपलब्ध करून देणार आहेच. शासनाबरोबर आर्थिक सधन व्यक्तीनी व स्वयंसेवी संस्थानी ही या व इतर भागात जेथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरूच करण्यासाठी प्रयत्न करावे. असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com