School Renovation : कोपरे जिल्हा परिषद शाळेचे पालटले रुप

जुन्नर येथील डिसेंट फाऊंडेशनचा पुढाकार; सव्वाचार लाख रुपये खर्च
Kopare Zilla Parishad School renovation Initiative of Descent Foundation in Junnar
Kopare Zilla Parishad School renovation Initiative of Descent Foundation in Junnar sakal

सिंहगड : महिला, मुली, दिव्यांग व आदिवासी समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या जुन्नर येथील डिसेंट फाऊंडेशनच्या पुढाकारातून वारजे- एनडीए रस्त्याला लागून असलेल्या कोपरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रुप पालटले आहे. फाऊंडेशनने शाळेच्या दुरुस्ती व रंगरंगोटीच्या कामांसाठी तब्बल सव्वाचार लाख रुपये खर्च केला असून विद्यार्थी,पालक व शिक्षक समाधान व्यक्त करत आहेत.

कोपरे येथील शाळेत सध्या 163 मुली व 145 मुले असे एकूण 308 विद्यार्थी शिक्षण घेत असून एकूण 13 शिक्षक कार्यरत आहेत. शाळेतील भिंती,छत, संरक्षक भिंत, शौचालय, मैदान अशा सर्व भौतिक सुविधा अत्यंत वाईट अवस्थेत होत्या. डिसेंट फाऊंडेशनने या शाळेची निवड केली व दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली.

शौचालयाची दुरुस्ती करण्यात आली, भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली व आकर्षक चित्रे काढण्यात आली, गंजलेल्या छताच्या पत्र्याला रंग देण्यात आला, खेळाचे मैदान सपाट करण्यात आले, तारेचे कुंपण करण्यात आले व गेट बसविण्यात आले. तीन महिन्यांच्या काळात शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये झालेले बदल सध्या विद्यार्थी आणि शिक्षक अनुभवत असून शाळेत येण्यास टाळाटाळ करत असलेले विद्यार्थी आता दररोज शाळेत यायला लागले असल्याचे शिक्षक आनंदाने सांगत आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या सुधारित शाळेचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, प्रमुख वक्ते बालाजी जाधव, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार,उमेश रोकडे, माजी उपसरपंच नितीन धावडे, मनिषा मोरे, बेबीताई चव्हाण, मुख्याध्यापिका गीता चोरगे, मुख्याध्यापक रामचंद्र डावखरे, डिसेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष महेंद्र बिडवई, योगेश धर्मे, कुशल करेवार, संतोष यादव, श्याम धावडे सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

"शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. विद्यार्थी आनंदाने शाळेत येत आहेत. मैदान चांगले करण्यात आल्याने शाळेने खेळातही बक्षिसे पटकावली आहेत. डिसेंट फाऊंडेशनमुळे शाळा जिवंत झाली आहे."

- शिवाजी सोनवणे, पदवीधर शिक्षक, कोपरे शाळा.

"वारजे ते पानशेत पर्यंतच्या चाळीस शाळांचा आम्ही सर्व्हे केला. यापैकी कोपरे शाळेची अवस्था अत्यंत खराब असल्याने आम्ही तेथे काम करण्याचा निर्णय घेतला. एकूण सव्वाचार लाख रुपये खर्च संस्थेने केला असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर व्हावेत हा यामागील उद्देश आहे."

- महेंद्र बिडवई, अध्यक्ष, डिसेंट फाऊंडेशन, जुन्नर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com