कोरेगाव-भीमात नांगरे पाटील टीमसह उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पुणे : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील आणि त्यांची टीम हे आज (मंगळवार) पहाटेपासूनच कोरेगाव-भीमाजवळ पेरणे फाटा येथील विजयस्तंभाच्या बंदोबस्ताच्या ड्युटीवर हजर झाले.

नांगरे यांनी गेल्या वर्षी स्थानिक नागरिक आणि अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चिडलेला जमाव त्यांच्या शब्दांवर शांत झाल्याचा अनुभव सणसवाडी येथे आला होता. या भागाची त्यांना पुणे एसपी असल्यापासून माहिती असल्याने त्याचा उपयोग झाला होता.

गेल्या वर्षीचा प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी पुरेशी दक्षता घेतली आहे. तब्ब्ल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त पेरणे फाटा परिसरात लावण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलिस येथे तळ ठोकून आहेत. राज्याच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सतत अपडेट दिले जात आहेत. तसेच पुण्यातही पोलिस टिम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

खासगी वाहनांना विजयस्तंभाजवळ येण्यास मनाई करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी निर्धास्तपणे यावे, असे आवाहन नांगरे पाटील यांनी केले. स्थानिक नागरिकांनीही येणाऱ्या गर्दीचे उत्साहात स्वागत केले.

Web Title: Koregaon-Bhima Nangre Patil came on the road with the team for Security