दलित बांधवांची विजयस्तंभास मानवंदना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कोरेगाव भीमा - ऐतिहासिक भीमा कोरेगाव लढाईच्या द्विशताब्दीनिमित्त पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास राज्यभरातील हजारो दलित बांधवांनी सोमवारी (ता. १) मानवंदना दिली. दिवसभरात विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने रॅली तसेच अभिवादन सभा घेण्यात आली. तसेच विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली.

पेरणे फाटा येथील नियोजित कार्यक्रमास रविवारपासूनच सुरवात झाली. सोमवारी सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार जयदेव गायकवाड, बहुजन समाज पार्टीचे विजय गरुड, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, जिल्हाध्यक्ष लताताई शिरसाट, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मीराताई आंबेडकर, दलित कोब्राचे ॲड. भाई विवेक चव्हाण, बहुजन समाज पार्टी, भीमशक्ती, सामाजिक विकास संघटना, बहुजन सुरक्षा गट, झोपडपट्टी सुरक्षा दल, भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ, बुद्धिष्ट मूव्हमेंट सेंटर ट्रस्ट, फुले-शाहू आंबेडकर विचार मंच, भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आदींसह विविध संस्था व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ व पेरणे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आवश्‍यक त्या सुविधा देण्यात आल्या.

वाहतुकीची कोंडी
वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी नगर रस्त्यावर चारही बाजूंनी येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र, तरीही नगर रस्त्यावर प्रचंड वाहन कोंडी झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, विविध पक्षसंघटनेच्या सभा, संमेलने, मेळावे, पुस्तक प्रदर्शन-विक्री असे अनेक कार्यक्रम झाले.

Web Title: koregaon bhima news