सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे - बडोले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या भीमसैनिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या अनुयायींना चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा देण्यासोबतच सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केली.  

विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमानिमित्त कोरेगाव भीमा येथे नागरिक येणार आहेत. त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत बडोले आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आढावा घेतला. 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
नागरिकांना शुद्ध पाणी, पार्किंग व्यवस्था, पार्किंग ते विजयस्तंभापर्यंत बसेसची व्यवस्था, कार्यक्रमाच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षा बंदोबस्त याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बापट आणि बडोले यांनी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सुविधांबाबत कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांची दखल यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश बापट यांनी अधिकाऱ्यांना दिले.

विविध संघटनांच्या सूचनांचा आदर करून विजयस्तंभाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात येईल. जमिनीबाबत न्यायालयात प्रलंबित खटल्यासाठी राज्य सरकारकडून वकिलाची नियुक्‍ती केली आहे. विजयस्तंभास अभिवादन करण्याचा कार्यक्रम शांततेने पार पाडावा. 
- राजकुमार बडोले, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री

विजयस्तंभ परिसरास भेट
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी पेरणे फाटा येथील विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या तयारीची पाहणी करून सूचना दिल्या. समाज कल्याण आयुक्‍त मिलिंद शंभरकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक संदीप जाधव, संदीप पखाले, सर्जेराव वाघमारे, संजय दाणी, राहूल डंबाळे, विशाल सोनवणे, लता शिरसाट, राजीव सोनकांबळे, संतोष निकाळजे, आरती डोळस, रमेश सावंत, बबन कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Koregaon Bhima Rajkumar Badole