Kothrud Fire : भुजबळ टाऊनशिपमध्ये आग! जीवितहानी नाही, आगीत 4 खोल्या जळून खाक

कोथरूड मधील भुजबळ टाऊनशिपमधील अकराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत 4 खोल्या जळून खाक झाल्या.
Bhujbal Township Fire
Bhujbal Township FireSakal

कोथरूड - कोथरूड मधील भुजबळ टाऊनशिपमधील अकराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत 4 खोल्या जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, फ्लॅटमधील साहित्य, फर्निचर पूर्णपणे जळाले.

टाऊनशिपच्या अकराव्या मजल्यावर ओंकार भुजबळ व कुटुंबिय यांचा नऊ रूमचा फ्लॅट असून, दुपारी अचानक घरातील खोल्यांमधून धुर येऊ लागल्याने सर्व सदस्य घराबाहेर पडले आणि क्षणात आगीने रूद्र रूप धारण केले. आगीमुळे संपूर्ण इमारतीमध्ये धुर पसरला. दरम्यान कोथरूड अग्निशामक दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.

अग्निशामक अधिकारी गजानन पाथ्रुडकर यांच्यासह तांडेल अंगत निपाणे, अमोल पवार, चालक महेश शिळीमकर, प्रतिक पानसे यांच्यासह एरंडवणा, नवले, वारजे आणि कंट्रोलकडील दोन अग्निशामक गाड्या आणि एक टॅकरच्या मदतीने ही आग आटोक्‍यात आणली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com