Medha Kulkarni : मेधा कुलकर्णींना राज्यसभा, मुरलीधर मोहोळांचा मार्ग झाला सुकर

कोथरुडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना भारतीय जनता पक्षाने आज राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या या चालीने एकाच बाणानं अनेक लक्ष्य साध्य केली आहेत. प्रामुख्याने लोकसभेची निवडणूक उंबरठ्यावर आली आहे.
Medha Kulkarni
Medha Kulkarni Sakal

Pune News - कोथरुडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना भारतीय जनता पक्षाने आज राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या या चालीने एकाच बाणानं अनेक लक्ष्य साध्य केली आहेत. प्रामुख्याने लोकसभेची निवडणूक उंबरठ्यावर आली आहे.

आता मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याने पुणे लोकसभा मतदार संघातले भाजपच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चंद्रकांत पाटील यांना सुरक्षित मतदारसंघ मिळावा म्हणून मेधा कुलकर्णींना डावलले होते. त्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज होत्या. विद्यमान लोकसभेत गिरीष बापट पुण्याचे खासदार होते.

मात्र, त्यांचे दुर्दैवी निधन झाले. पुण्यात ब्राह्मण उमेदवारच द्यावा असा एक आग्रही मतप्रवाह होता. मात्र, मराठा मतांची संख्या लक्षात घेता पुण्यात मराठा उमेदवारच द्यावा, असा पक्षाच्या गोटात विचार सुरु होता.

पुण्यात कोथरुड विधानसभा मतदारसंघातलेच मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजप नेते सुनिल देवधर हे तिघेही लोकसभा लढवायला इच्छुक आहेत. तिघांनीही शहरात कार्यक्रम घेण्याचा सपाटा लावला आहे. यापैकी मोहोळ यांनी शहर पातळीवर जात 'अपने अपने राम' हा कार्यक्रम आयोजित करुन एकाचवेळी बहुसंख्य मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पल्ला गाठला.

Medha Kulkarni
Rajya Sabha Election 2024 : जया बच्चन यांना पुन्हा उमेदवारी ; समाजवादी पक्षाने राज्यसभेच्या तीन उमेदवारांची नावे केली जाहीर

कोरोना काळात मोहोळ महापौर होते. त्यावेळी त्यांनी रस्त्यावर उतरून काम केलं होतं. त्याचं आठवण लोक आजही काढतात. या लोकप्रियतेचा फायदा मोहोळांना मिळेल असे बोलले जाते. मात्र, ब्राह्मण मतदार खेचण्यासाठी भाजपने लोकसभेला ब्राह्मणच उमेदवार द्यायचा विचार केला असता तर मोहोळ यांची अडचण झाली असती. पण ही अडचण पक्ष नेतृत्वानंच सोडवली आहे. राज्यसभेवर मेधा कुलकर्णींना उमेदवारी देऊन पक्षानं हा प्रश्न सोडवला आहे.

त्यामुळे आता पुणे भाजपची लोकसभेची उमेदवारी मराठा समाजातल्या उमेदवाराला देण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातच भाजपनं पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूकप्रमुख म्हणून भाजपचे नेते व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड केली.

Medha Kulkarni
Pune : हिंगण्यातील मांडव साहित्याच्या गोदामाला आग ; आग विझविण्यासाठी चार बंब आणि दोन पाण्याचे टँकर

साधारणतः निवडणूक प्रमुखालाच उमेदवारी मिळते हा संकेत आहे. त्यामुळे आता मोहोळ यांचा लोकसभेचा मार्ग मोकळा झाला आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे नाराज मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपने कोथरुडचाही प्रश्न मिटवला आहे.

कोथरुडचा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना म्हणजेच चंद्रकांत पाटलांना मिळेल, असे बोलले जाते. आता नाराजी नसल्याने मेधा कुलकर्णींनाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी जीव ओतावा लागेल आणि त्यातून हे दोन्ही विजय सुकर होतील, असा पक्षाच्या या तिहेरी खेळीतला गुढार्थ आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com