esakal | पुणे शहरात मूर्ती दानात कोथरूड सर्वात पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati Donate

पुणे शहरात मूर्ती दानात कोथरूड सर्वात पुढे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात दीड दिवसाच्या ४ हजार ३१० गणपतीचे विसर्जन (Ganpati Immersion) झाले आहे. यामध्ये २ हजार १७८ मूर्त्यांचे संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे मूर्ती संकलन केंद्राला कोथरूडकरांनी (Kothrud) सर्वाधिक प्रतिसाद दिला असून, ८६५ मूर्त्या जमा केल्या आहेत, अशी नोंद घनकचरा विभागाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

महापालिकेने गणपती विसर्जनासाठी शहरात फिरत्या हौदाची व मूर्ती संकलनाची व्यवस्था उभारली आहे. त्यासाठी घनकचरा विभाग, क्षेत्रीय कार्यालय व नगरसेवकांनी स्वतःच्या पुढाकारातून फिरते हौद उपलब्ध करून दिले आहेत. दीड दिवसाच्या गणपतीसाठी महापालिकेकडून यंत्रणा उभी करण्यास उशीर झाल्याने विसर्जन कुठे करायचा असा प्रश्‍न नागरिकांना निर्माण झाला होता. मात्र, सायंकाळनंतर शहरात बऱ्यापैकी व्यवस्था निर्माण झाली.

शनिवारी (ता. ११) शहरात घनकचरा विभागाचे ५३ फिरते हौद होते, क्षेत्रीय कार्यालयांनी ६० तर नगरसेवकांनी ३० फिरत्या हौदाची व्यवस्था केली होती. तर निर्माल्य संकलनासाठी १७१ केंद्र होते. फिरत्या हौदांमध्ये २ हजार १३२ मूर्त्यांचे विसर्जन झाले, तर २५७ संकलन केंद्रावर २ हजार १७८ नागरिकांनी मूर्ती जमा केल्या आहेत. नागरिकांनी मोठ्याप्रमाणात घरच्या घरीही विसर्जन करण्यास मोठा प्रतिसाद दिला, यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ११ हजार २८५ अमोनिअम बायकार्बोनेटचे वितरण करण्यात आले आहे.

हेही वाचा: पीएमआरडीए- विकास आराखड्यावर ३१ हजारांहून अधिक हरकती

क्षेत्रीय कार्यालयनिहाय झालेले विसर्जन

क्षेत्रीय कार्यालय - मूर्ती संकलन - हौदात विसर्जन

वडगाव शेरी - ६१ - ३९

येरवडा - - २१ - १९०

ढोल रस्ता - २ - १०२

औंध - १८९ - ३६

घोले रस्ता - ० - २४४

कोथरूड - ८६५ - ३१०

धनकवडी - १७५ - २७७

सिंहगड रस्ता - ३७ - ३१६

वारजे कर्वेनगर - ३६ - १०४

हडपसर - ९० - १२

वानवडी - १८ - १४७

कोंढवा - २२६ - १०६

कसबा विश्रामबागवाडा -३३५ - ४३

भवानी पेठ - ३४ - ५३

बिबवेवाडी - ८९ - १५३

एकूण- - २१७८ - २१३२

loading image
go to top