esakal | पीएमआरडीए- विकास आराखड्यावर ३१ हजारांहून अधिक हरकती
sakal

बोलून बातमी शोधा

PMRDA

पीएमआरडीए- विकास आराखड्यावर ३१ हजारांहून अधिक हरकती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्यावर आतापर्यंत ३१ हजाराहून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. हरकती दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांची मुदत राहिली आहे. दरम्यान हरकती-दाखल करण्यास आखणी पंधरा दिवसांची मुदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

पीएमआरडीएने हद्दीचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. या आराखड्यावर ३ 0 ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढविण्यातय यावी अशी मागणी नागरीकांकडून होत होती. अखेर ही मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत येत्या दोन दिवसांत संपुष्टात येणार आहे. आतापर्यंत या आराखड्यावर ३१ हजारांहून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत.

पीएमआरडीएची हद्द विचारात घेता ही मुदत आणखी १५ दिवसांनी वाढविण्यात यावी, अशी मागणी होते. महाराष्ट्र राज्य नगर रचना कायद्यानुसार (एमआरटीपी ॲक्टनुसार) जास्तीत दोन वेळा मुदत वाढ देता येते. याचा विचार करून राज्य सरकारने आणखी एक मुदत द्यावी,असे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे हरकतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

पीएमआरडीएच्या हद्दीत सुमारे 731 गावांचा समावेश होत असून हरकती नोंदविण्यासाठी नागरिकांना औंध येथील कार्यालयात यावे लागत होते. मात्र आता प्राधिकरणाने औंध कार्यालयासह, आकुर्डी कार्यालय (नविन प्रशासकीय इमारत पिंपरी चिंचवड प्राधिकरण), वाघोली क्षेत्रीय कार्यालय, नसरापूर क्षेत्रीय कार्यालय आणि वडगाव मावळ क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी हरकती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा: "CM नहीं PM बदलो! मुख्यमंत्री बदलण्याने मोदींचं अपयश झाकणार नाही"

कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता ज्या नागरिकांना घराबाहेर पडणे शक्‍य नाही, अशा नागरीकांसाठी ईमेलद्वारे हरकती नोंदविण्याची सुविधा प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या pmr.dp.planning@gmail.com या ईमेलवर हरकती पाठविता येणार आहेत.

loading image
go to top