
कोथरुड (पुणे) ः कोथरुडमधील कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 333 वर पोहचली असून अवघ्या सहा दिवसात ती दुपटीपेक्षा अधिक झाल्याने कोथरुडकरांची चिंता वाढली आहे. १२ जूनला शंभर असणारी कोरोना रुग्णांची संख्या १६ जून रोजी ही संख्या 162 होती. आता या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी प्रशासनाला कठोर उपाय योजना कराव्या लागणार आहेत.
कोथरुडमध्ये पहिला रुग्ण २३ मार्च रोजी सापडला. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने २५ एप्रिल रोजी कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला. तीन मे रोजी तिसरा, चार मेला चौथा आणि नंतर हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. ३० मे रोजी ही संख्या ३१ होती. जून पासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोथरुडमध्ये केळेवाडी भागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्या खालोखाल शास्रीनगर परिसरातील श्रीकृष्ण कॉलनी, पीएमसी कॉलनी, लक्ष्मी नगर येथे रुग्ण आढळले आहेत. प्रभाग 12 मध्ये सोसायट्यांची संख्या जास्त आहे. परिसरात कौटुंबिक व व्यक्तीगत स्वच्छतेकडे लक्ष दिले जात असल्याने या भागातील रुगणांची संख्या मर्यादीत आहे.
पुरंदर तालुका 30 वर; पुन्हा मुंबई - पुणे कनेक्शनमधूनच धोका वाढतोय
केळेवाडी परिसरातील एआएआय रोड, विश्वशांती मंडळ, बालशक्ती मंडळ, वसंतनगर, मोरे श्रमिक वसाहत, मेगासिटी या भागात ६७ रुग्ण सापडले आहेत. तर शास्रीनगर परिसरातील पीएमसी कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, पत्राचाळ, मराठा महासंघ सोसायटी, लोकमान्य वसाहत या वस्ती भागात ५७ लोक सापडले आहेत. कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले की, वस्ती पातळीवर जाऊन महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक कोरोना संशयित कोणी आहे का याची पडताळणी करत आहेत. संशयितांची तपासणी करुन पुढील उपचार केले जात आहेत. स्वच्छतागृहांची वारंवार स्वच्छता करणे आदी उपाय योजना सुरु आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोना बाधितांची आकडेवारी
३० मे- ३१, १२ जून- १००, १३ जून ११६, १४ जून १४१, १५ जून १४२, १६ जून- १६२, २२ जून ३३३
प्रभाग १० कोथरुड डेपो, बावधन- 108
प्रभाग ११ शिवतीर्थनगर, रामबाग कॉलनी-186
प्रभाग १२ मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी- 39
कोरोनामुक्त- 107
कोरोनामुळे मृत्यू पावलेले- 8
कोरोनावर उपचार सुरु असलेले- 218
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.