अरे बापरे ! ग्रीन झोन राखणाऱ्या कोथरूडची कोरोना हाॅटस्पाॅटच्या टाॅप फाइव्हमध्ये 'एन्ट्री'

kothrud.jpg
kothrud.jpg

कोथरुड (पुणे) :  पुणे शहरातील कोरोना हाॅटस्पाॅटचा विचार करता कोथरूड बावधनचा समावेश पहिल्या पाचात झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात कडक लाॅकडाऊन पाळल्यामुळे कोथरूड अनेक दिवस ग्रीनझोन मध्ये होते. दारूची दुकाने चालू झाली अन् कोथरूडमध्ये कोरोनाने जोरदार मुसंडी मारली. कोथरुड मधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजवरच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या शनिवारी संध्याकाळ पर्य॔त  6635 इतकी झाली आहे. कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 5429 आहे ही त्यातल्यात्यात दिलासादायक बाब आहे. अँक्टीव्ह रुग्ण संख्या 1135 इतकी  आहे. कोथरुड मध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 71 इतकी आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

प्रभाग क्रं. 10 कोथरुड डेपो, बावधन येथे 2386 इतकी कोरोना बाधितांची संख्या आहे. प्रभाग क्रं. 11 मध्ये शिवतीर्थनगर, रामबाग कॉलनीभागात  2377 तर त्याखालोखाल  प्रभाग 12 मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी येथे 1872 कोरोना रुग्ण आजवर सापडले आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची  गरज निर्माण झाली आहे.  कोथरुडमध्ये अण्णासाहेब पाटील शाळा शास्त्रीनगर, राऊत दवाखाना एरंडवणा येथे मोफत कोविड तपासणी केंद्र महापालिकेच्या वतीने चालवण्यात येते. त्याशिवाय काही सोसायट्या, विभागात मागणी आल्यास आवश्यकतेनुसार एक दोन दिवसाची तपासणी मोहीम घेण्यात येते. बावधन, भुसारी कॉलनी, केळेवाडी, स्नेह पॅरडाईज सोसायटी आदी भागात अशा पध्दतीने तपासण्या झाल्या आहेत.
 

 कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम म्हणाले की, `कोथरूड मधील मृत्युदराचे प्रमाण  एक टक्केच्या आसपास आहे. ते नियंत्रणात रहावे यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.  नागरिकांनी योग्य काळजी घेवून प्रशासनास सहकार्य करावे. मास्क न घालता फिरणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.`

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com