Pimpri News

Pimpri News

esakal

‘एमआयडीसी’त वृक्षतोड करणारे मोकाटच

प्रशासनाची डोळेझाक; अनधिकृत टपऱ्या थाटण्यासाठी कृत्य
Published on

पिंपरी : तळवडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व आयटी पार्क परिसरात अनधिकृत टपऱ्यांसाठी अडसर ठरणाऱ्या झाडांची रात्रीत कत्तल केली जात आहे. ‘एमआयडीसी’ प्रशासनाला वृक्षतोडीची माहिती देऊनही कारवाई केली नाही. तसेच, हे कृत्य करणारेही मोकाट आहेत.

शहरालगत असलेल्या तळवडे आयटी पार्कमध्ये अनेक ठिकाणी मोकळ्या जागा आहेत. या जागांवर पान-मसाला, चहा, वडापाव असे विविध व्यवसाय करणाऱ्या टपऱ्या आहेत. दिवसेंदिवस या टपऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. काही विक्रेत्यांनी थेट पदपथावर टपऱ्या थाटल्यात. यातील बहुतांश टपऱ्या अनधिकृत आहेत.

पण, या विक्रेत्यांवर आणि अनधिकृत टपऱ्यांवरही कारवाई होत नाही. आता तर अनधिकृत टपऱ्यांसाठी मोकळ्या जागेवरील वृक्षांची कत्तल सुरू केली आहे. नवीन टपरी टाकण्यासाठी अडसर ठरणाऱ्या वृक्षांवर रात्रीत कुऱ्हाड चालवली जात आहे. पर्यावरण विभाग, एमआयडीसी किंवा महापालिका प्रशासनाची परवानगी न घेता अनधिकृत वृक्षतोड केली जात आहे. पंधरा दिवसांत दोन ते तीन झाडांवर कुऱ्हाड चालवली असून दिवसेंदिवस या परिसरातील वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

तळवडे आयटी पार्कसंबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.

- कालिदास भांडेकर, मुख्य अभियंता, ‘एमआयडीसी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com