पुणे : आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा के. पी. गोसावी फरार आरोपी

अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान यास हाताला धरून नेणारा व त्याच्यासमवेत "सेल्फी' घेणारी ती व्यक्ती कोण? असा प्रश्‍न अनेकांना पडला होता.
KP Gosavi
KP GosaviSakal

पुणे - अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान यास हाताला धरून नेणारा व त्याच्यासमवेत "सेल्फी' घेणारी ती व्यक्ती कोण? असा प्रश्‍न अनेकांना पडला होता. त्यावरुन मोठी चर्चा झडली असतानाच आता संबंधीत व्यक्ती हि 2018 मध्ये पुण्यात फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आता पुढे येऊ लागली आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर "नार्कोटीक्‍स कंट्रोल ब्युरो'च्या (एनसीबी) पथकाने छापा घालून आठ जणांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानही "एनसीबी'च्या अधिकाऱ्यांच्या हाती लागली. दरम्यान, आर्यन खानला हाताला धरून घेऊन जाताना तसेच त्याच्यासमवेत "सेल्फी' घेतलेला एक फोटो समाजमाध्यमांमध्ये काही दिवसांपुर्वी प्रसारीत झाला. त्यानंतर संबंधीत व्यक्ती ही "एनसीबी'चा अधिकारी असल्याची माहिती पुढे आली, परंतु "एनसीबी'ने ती व्यक्ती आमची नसल्याचे यापुर्वीच स्पष्ट केले. त्यानंतर हि व्यक्ती आहे तरी कोण ? यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती.

दरम्यान, संबंधीत व्यक्ती हा के.पी.गोसावी नावाचा व्यक्ती असून तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला. दरम्यान, 29 मे 2018 या दिवशी फरासखाना पोलिस ठाण्यात चिन्मय देशमुख यांनी गोसावी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गोसावीने फेसबुकवर "हॉटेल्स मॅनेजमेंट जॉब्स ग्रुप'वर हॉटेल्स मॅनेजमेंटच्या जागा असल्याची जाहीरात केला होती.

KP Gosavi
बदलत्या आव्हानांसाठी लोहगाव एअर फोर्स स्टेशन मोलाचे ठरत आहे; भूषण गोखले

जाहिराती पाहून काही तरुणांनी त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चार लाख रुपये भरल्यास मलेशिया येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. गोसावी पोलिसांना सापडला नाही, त्यांनी त्यास फरारी घोषीत करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर संबंधीत प्रकरणाचे पुढे काय झाले, याचा तपास पुणे पोलिस आता करीत आहेत. दरम्यान, गोसावी याने याच पद्धतीने आणखी काही तरुणांनाही फसविल्याची शक्‍यता आहे.

'आर्यन खानसोबतची ती व्यक्ती के.पी.गोसावीच आहे की आणखी कोणी आहे, याची आम्ही तपासणी करीत आहोत. त्यादृष्टीने जुनी कागदपत्रे तपासण्याचे काम फरासखाना पोलिसांकडून सुरू आहे.'

- सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com