कृषी प्रयोगांचा उत्सव

Krutik
Krutik

बारामती - येथील कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेले ‘कृषिक’ हे शेती प्रात्यक्षिकांवरील कृषी प्रदर्शन गुरुवारपासून (ता. १७) सुरू होत आहे.

कृषिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन उद्या ‘इक्रीसॅट’चे महासंचालक डॉ. पीटर कार्बेरी, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, टाटा ट्रस्टचे श्री. वेंकटरमण, कृषी आयुक्त सच्चींद्र प्रतापसिंह, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. मोहम्मद आरिज अहमद, मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विदळे, अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे.

हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. २०) सुरू राहणार आहे. प्रदर्शनासाठी ११० एकर शेतीतील फळ, फूल, भाजीपाला पिकांच्या विविध नव्या जाती, नवी खते, नव्या तंत्रज्ञानाने युक्त लागवड व पाणी व्यवस्थापन पद्धतीची जवळपास १५० प्रात्यक्षिके असून, देशविदेशांतील विविध २२५ हून अधिक कंपन्या त्यांच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनाची जय्यत तयारी झाल्याची माहिती केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली व या प्रदर्शनाचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘पॅंटम’ संस्थेचे संचालक हर्षवर्धन पानसरे व वैभव तांबे यांनी दिली. दरम्यान, या प्रदर्शनासाठी शारदानगर येथे प्रदर्शन स्थळासमोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील दोन वर्षे होत असलेल्या गर्दीमुळे ही सुटसुटीत व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com