Pune News : क्षितिज डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ रघुनाथ रामकर, सचिवपदी डॉ अनिल गावडे

क्षितिज डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ रघुनाथ रामकर यांची तर सचिवपदी डॉ अनिल गावडे यांची निवड करण्यात आली.असोसिएशनची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली.
Pune News
Pune Newssakal

वाघोली : क्षितिज डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ रघुनाथ रामकर यांची तर सचिवपदी डॉ अनिल गावडे यांची निवड करण्यात आली.असोसिएशनची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत नवीन कार्यकारणी निवडण्यात आली.

वाघोली व परिसरातील डॉक्टरांची ही संघटना आहे. माजी अध्यक्ष डॉ श्रीकांत भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली.

इतर कार्यकारणी पुढीलप्रमाणे -- उपाध्यक्ष - डॉ देवेंद्र नहार, सहसचिव - डॉ राकेश कंद, कोषाध्यक्ष - डॉ विशाल पाखरे, सहकोषाध्यक्ष - डॉ संदीप घाटगे. त्याचप्रमाणे क्रीडा, सांस्कृतिक,मेडिकोलीगल आदी समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. वुमेन्स फोरम मध्ये डॉ नीलम गावडे,डॉ रजनी नहार,डॉ वर्षा कंद,डॉ आरती शिंदे,डॉ सविता खरात आदींची निवड करण्यात आली.

Pune News
Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ कायम ; वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन जणांची ६५ लाखांची फसवणूक

या सभेत नवनियुक्त सचिव डॉ गावडे यांनी मागील दोन वर्षातील सामाजिक,वैद्यकीय,कला,क्रीडा इत्यादी क्षेत्रात असोसिएशन कडून केलेल्या कामाचा तपशील सादर केला, तर सहसचिव डॉ कंद यांनी आर्थिक ताळेबंद सादर केला. डॉ भुजबळ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डॉ भरत शितोळे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com