Junnar Celebrates Success of Native Son in Latest Police Bharti Selection
Sakal
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कुकडेश्वर येथील पंकज सुदाम दिवटे याने खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन प्रयत्नातील सातत्य व चिकाटीच्या जोरावर पोलिस भरतीमध्ये यश मिळविले. पंकज याची नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील भरतीमध्ये मुंबई शहर पोलिस दलात निवड झाली. पंकज ने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.