कुकडी प्रकल्पात १.७ टीएमसी जादा पाणीसाठा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

नारायणगाव - कुकडी प्रकल्पात आजअखेर ६.९० टक्के म्हणजेच एकूण २.५९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजअखेर २.५९ टक्के म्हणजे ०.७९२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. गतवर्षाच्या तुलनेत १.७९ टीएमसी उपयुक्त साठा जास्त आहे. पाऊस लांबल्यास स्थिती चिंताजनक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  

कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे, पिंपळगाव जोगे या धरणांचा समावेश होतो. या धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता ३०.५४ टीएमसी आहे. या धरणातील पाण्याचा लाभ पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, तर नगर जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, श्रीगोंदा आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या सात तालुक्‍यांना शेती सिंचन व बिगर सिंचनासाठी (औद्योगिक व पिण्यासाठी) होतो. हा प्रकल्प केवळ खरीप व रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी असून, या वर्षी प्रथमच उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. डिंभे डावा व कुकडी डावा कालव्याच्या दुरवस्थेमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे. 

धरणनिहाय उपयुक्त साठा (कंसात टक्के)
येडगाव - ०.५२२ टीएमसी (१८.६७), माणिकडोह - ०.५३ टीएमसी (५.२१), वडज - ०.११४ टीएमसी (९.७५), डिंभे - ०.९४ टीएमसी (७.५२ टक्के). पिंपळगाव जोगे - २.९ टीएमसी मृतसाठा.   

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पातून वर्षभरात खरीप हंगामासाठी दोन, रब्बी दोन व उन्हाळी एक अशी पाच आवर्तने सोडली आहेत. डिंभे डावा व कुकडी डावा कालवा गळतीमुळे उन्हाळी आवर्तनात खंड पडला आहे.
-जे. बी. नान्नोर,  कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प 

Web Title: Kukadi project 1.7 TMC water excess