जातीचा बनावट दाखला काढणाऱ्या जुन्नरमधील या सरपंचांना अटक

arrest
arrest

जुन्नर (पुणे) : खोट्या दस्तऐवजाद्वारे जातीचा दाखला काढून सरकारी कामासाठी त्याचा उपयोग करून फसवणूक केली. या प्रकरणी कुमशेत (ता. जुन्नर) येथील सरपंच सीताबाई लक्ष्मण दुधवडे यांना जुन्नर पोलिसांनी बुधवारी (ता. 20) अटक केली. जुन्नर न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती तपास अधिकारी मिलिंद साबळे यांनी दिली.

सीताबाई दुधवडे यांच्या विरोधात पाडळी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नमाला दुराफे यांनी जुन्नर पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420, 465, 467, 468, 471, 472 अन्वये ता. 18 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती जुन्नरचे सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद साबळे यांनी दिली.
संबंधित महिलेने फसवणूक करण्याच्या उद्देशाने माहेरचे नाव सांगून पाडळी येथील शाळेतून तत्कालीन मुख्याध्यापकांकडून शाळा सोडल्याचा दुबार दाखला काढला.यानंतर शाळेच्या नावाने खोटे शिक्के तयार करून आपल्या वडिलांचा शाळा सोडल्याचा खोटा दाखला तयार केला. या दाखल्यांवरून स्वतःचा जातीचा दाखला काढून त्याचा सरकारी कामकाजासाठी वापर करून सरकारची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सीताबाई दुधवडे यांचे माहेरचे नाव चंद्रभागा बाळू केदारी आहे, असे सांगून पाडळी शाळेतून तत्कालीन मुख्याध्यापक पोपट सांगडे यांच्याकडून त्यांनी शाळा सोडल्याचा दुबार दाखला मिळविला. शालेय दप्तरात वडील बाळू केदारी यांची नोंद नसताना तत्कालीन मुख्याध्यापक वामन साबळे यांच्या नावाने खोटी सही करून, शाळेच्या नावाचे खोटे शिक्के तयार केले. त्याचा वापर करून शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार केला. त्या दाखल्याच्या आधारे त्यांनी स्वतःचा जातीचा दाखला काढला असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com