Kundmala bridge collapse video : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील एक जूना पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे. या घटनेत 15 जण गंभीर जखमी झाले असून, तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे.