esakal | तंटामुक्तच्या अध्यक्षालाच मारहाण; 9 जणांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

बकरी चोरीचा संशय घेतल्याचा राग मनात ठेवून 9 जणांच्या गटाने तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तंटामुक्तच्या अध्यक्षालाच मारहाण; 9 जणांवर गुन्हा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कुरकुंभ - बकरी चोरीचा संशय घेतल्याचा राग मनात ठेवून 9 जणांच्या गटाने तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळावारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी संपत शेलार यांचे भाऊ पंढरीनाथ यांच्या मळद येथील घरासमोरील 1 फेब्रुवारी 2021 रोजी बकरी चोरीचा संशय घेतला होता. याचा राग मनात धरून हल्ला करण्यात आला. कुरकुंभ इथल्या मळदचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असलेल्या संपत शेलार यांच्यासह आणखी एकाला मारहाण केली. याप्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संपत शेलार यांनी पोलिसात फिर्याद दिली. 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कुरकुंभ येथील हॉटेल श्रीनाथ समोर स्विफ्ट ( एमएच. 05, एक्स. 9075 ) गाडी व दोन दुचाकीवरून तरुण आले. या तरुणांनी मळद तंटामुक्त समितीचे संपत शेलार व बाळकृष्ण रघुनाथ गिरमे यांना लाकडी दंडूके , पाईपने मारहाण केली. दोघेही या माराहाणीत गंभीर जखमी झाले.

हे वाचा - पुन्हा लॉकडाउन नकोच! व्यापाऱ्यांची अपेक्षा

पोलिसांनी याप्रकरणी चंदू हिवरकर ( रा. दत्तवाडी शिर्सुफळ, ता. बारामती,  जि. पुणे ), सुनील जाधव ( रा. गुजुबावी, ता. बारामती, जि. पुणे ) व इतर सात जणांविरूद्ध जमाव जमून लाकडी दंडूके, प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

loading image