केव्हीकेच्या कामाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

बारामती - ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील कृषी विज्ञान केंदातील कामकाज पाहून उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू प्रभावित झाले. येथील प्रायोगिक प्रकल्प व विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकांचे त्यांनी कौतुक केले. 

बारामती - ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील कृषी विज्ञान केंदातील कामकाज पाहून उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू प्रभावित झाले. येथील प्रायोगिक प्रकल्प व विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकांचे त्यांनी कौतुक केले. 

या भेटीत त्यांनी शेतीची विविध प्रात्यक्षिके, इंडो-डच उच्च गुणवत्ता भाजीपाला केंद्र, केव्हीकेच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा पाहिल्या. या वेळी त्यांच्यासमवेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, सुनंदा पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते आदी उपस्थित होते. 

उपराष्ट्रपतींनी भाजीपाला केंद्रास भेट दिली. ढोबळी मिरचीचे वाण, उत्पादकता व त्यातून मिळणारे उत्पन्नाची, भाजीपाला केंद्राच्या माध्यमातून विविध भाजीपाल्याची उत्पादकता कशी वाढवता येईल, याचीही माहिती त्यांनी घेतली. 
यानंतर मधमाशीपालन केंद्र व पशुजनुकीय संशोधनाची माहिती घेतली. 

या वेळी राजेंद्र पवार यांनी उपराष्ट्रपतींना बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली. केव्हीकेच्या इमारतीत उपराष्ट्रपतींनी केव्हीकेचा आजवरचा प्रवास व विविध संशोधनावर आधारित माहितीपट पाहिला.

Web Title: KVK work appreciation by venkaiah naidu