ओतूरला बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुर जखमी

पराग जगताप 
बुधवार, 16 मे 2018

ओतूर (जुन्नर) - येथे सोमवारी रात्री बिबट्याने हल्ला करुन शेतात झोपलेल्या शेतमजुरास जखमी केले.ओतूर येथिल घुलेपटा परिसरात उंब्रजपाधीला हा हल्ला झाला असुन, यात हनुमंत महादु जाधव हे जखमी झाले.

ओतूर (जुन्नर) - येथे सोमवारी रात्री बिबट्याने हल्ला करुन शेतात झोपलेल्या शेतमजुरास जखमी केले.ओतूर येथिल घुलेपटा परिसरात उंब्रजपाधीला हा हल्ला झाला असुन, यात हनुमंत महादु जाधव हे जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, हनुमंत महादु जाधव हे सदाशिव महादेव नलावडे यांच्या शेतात बाजरी राखण्याचे काम करत असुन, ते शेताच्या बाजुला पत्नी सिताबाई व दिडवर्षाचा नातू साहिल सह झोपले होते. रात्री बिबट्याने अचानक हल्ला करुन झोपलेल्या जाधव यांच्या ओठावर व तोंडावर पंजामारुन जखमी केले. जाधव व त्यांच्या पत्नी यांनी आरडाओरडा केला. मात्र शेताजवळ वस्ती नसल्यामुळे लवकर कुणाला त्यांचा आवाज एकु आला नाही. काही वेळानंतर परिसरातील काही लोक आवाज ऐकुन त्यांच्या मदतीला आले. त्यानंतर बिबट्या शेतात पळुन गेला.

त्यानंतर जाधव यांना ओतुर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्याची घटना समजताच ओतूर वनविभाचे एस.बी.महाले, विशाल अडागळे व एस.जी.मोमीन यांनी जखमींची भेट घेवुन वनविभागाच्या गाडीत पुणे येथे बिबटप्रतिबंधक लस देण्यासाठी पाठवण्याची तजबीज केली.

Web Title: The laborer is injured in the attack og leopard