esakal | आप वापस आयेंगे क्‍या ? पुण्याहून एमपीला निघालेले मजूर म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

wagholi1

53 मजुरांना दोन खासगी बसच्या माध्यमातून मध्य प्रदेश येथे पाठविण्यात आले.

आप वापस आयेंगे क्‍या ? पुण्याहून एमपीला निघालेले मजूर म्हणाले...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वाघोली (पुणे) : वाघोली येथे तात्पुरत्या निवाऱ्यात 45 दिवसापासून राहत असणाऱ्या 53 मजुरांना दोन खासगी बसच्या माध्यमातून मध्य प्रदेश येथे पाठविण्यात आले. बस निघाल्यानंतर मजुरांचे चेहरे खुलले होते. त्यांनीही टाळ्या वाजवल्या. आप वापस आयेंगे क्‍या असे विचारल्यावर आयेंगे लेकिन 6 - 8 महिने के बाद देखेंगे असे उत्तर त्यांनी दिले. 

आणखी वाचा- पुण्यात सिंहगड रस्यानं दाखवला संयम; रोखला कोरोनाचा राक्षस

लॉकडाऊनच्या सुरवातीला पायी निघालेल्या मजुरांना येथील तात्पुरत्या निवासात ठेवण्यात आले होते. सुमारे 70 मजूर येथे राहत होते. यातील 53 मजूर मध्य प्रदेशातील होते. तपासणी व अन्य प्रकिया पार पडल्यानंतर सोमवारी दुपारी त्यांना मध्य प्रदेशला पाठविण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना दोन्ही वेळचे जेवण तर जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी पाण्याच्या बाटल्या दिल्या. 

आणखी वाचा-पुण्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय; गेल्या तीन दिवसांत...

सामाजिक संस्था, ग्रामपंचायत, पोलिस यांच्या माध्यमातून त्यांची जेवण व अन्य सोय करण्यात आली होती. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, माजी सदस्य रामदास दाभाडे, पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, संदीप सातव, अनिल सातव, महेंद्र भाडळे, समीर भाडळे, सुधीर भाडळे, मारुती गाडे, ग्रामविकास अधिकारी महादेव चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला. येथील निवाऱ्यात अद्याप 15 ते 20 मजूर असून बसची संख्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठविण्यात येणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

नागपूरच्या तरुणांची मदत 

मजुरांना पाठविण्यासाठी 2 बस लागणार होत्या. त्याचे भाडेही भरपूर होते. मात्र, या मजुरांकडे पैसे नव्हते. ज्यांच्याकडे होते त्यांनी काही पैसे द्यायची तयारी दाखविली. ते फारच कमी होते. त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी वाघोली येथील कुणाल खेमेजा हा तरुण पुढे आला. त्याने आपल्या 1998 च्या 10 वीच्या तुकडीतील मित्रांना मदतीचे आवाहन केले. नागपूर येथील सेंट फ्रान्सिस द सेल्स हायस्कूलची ही तुकडी आहे. कुणाल या तरुणाने केवळ मदतच दिली नाही तर सकाळ पासून निवारा केंद्रात थांबून बस निघे पर्यंत सर्व मदत केली. पोलिस आणि या 10 वीतील तुकडीच्या आर्थिक मदतीने ते आपल्या राज्यात परतले. जाताना त्यांनी सर्वांचे आभार मानले. आतापर्यंत विविध राज्यातील 600 ते 700 मजुरांना बसच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात पाठविले असून निवारा केंद्रातील उत्तर प्रदेश मधील कामगारानांही लवकरच पाठविण्यात येईल. असे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले. 

loading image
go to top