esakal | Vidhan Sabha 2019 : #MLAReportCard : कँटोन्मेंटमध्ये मूलभूत सुविधांची कमतरता
sakal

बोलून बातमी शोधा

 report-card-1.jpg

#MLAReportCard 
कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मूलभूत सुविधांची कमतरता 
- कोरेगाव पार्कमधील वाहतूक कोंडी कायम 
- फातिमानगर चौकातील उड्डाण पूल अथवा ग्रेड सेपरेटर 
- वस्ती भागातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्‍न 
- टिंबर मार्केट, भवानी पेठेतील रखडलेली रस्तारुंदी 
- टिंबर मार्केटचे मोठ्या जागेत स्थलांतर 

Vidhan Sabha 2019 : #MLAReportCard : कँटोन्मेंटमध्ये मूलभूत सुविधांची कमतरता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : Vidhansabha2019 : शहराच्या मध्य भागातील आणि 'कॉस्मोपॉलिटन' असलेल्या कँटोन्मेंट या राखीव विधानसभा मतदारसंघातही वाहतुकीची समस्या आहेच. या मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे गेली साडेचार वर्षे मंत्री होते. तरी, बाजारपेठेच्या भागातील अरुंद रस्ते ही डोकेदुखी आहे, तर वस्ती भागात पिण्याच्या पाण्यापासून मूलभूत सुविधांची कमतरता जाणवते. कँटोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत असलेल्या भागात वाढीव 'चटई क्षेत्र निर्देशांका'चा (एफएसआय) प्रश्‍न रखडला असल्याने नव्या बांधकामांवर मर्यादा आल्या आहेत. घोरपडीतील लोहमार्गावरील उड्डाण पुलाचा प्रश्‍न मार्गी लागत असून, लुल्लानगरचाही उड्डाण पूल आता सुरू झाला आहे. 

उपस्थिती : शंभर टक्के 

गेल्या पाच वर्षांत झालेली कामे 
- घोरपडी येथील उड्डाण पुलाची प्रक्रिया पूर्ण 
- लुल्लानगरमधील उड्डाण पूल नागरिकांसाठी कार्यान्वित 
- ताडीवाला रस्ता आणि मंगळवार पेठ वस्ती भागात विकासकामे 
- मेट्रो प्रकल्पाच्या स्थानकांसाठी जागा उपलब्ध करून दिली 
- लष्कर पाणीपुरवठा केंद्रासाठी बंद पाइपलाइनने पाणी उपलब्ध करून दिले 

रखडलेली कामे 
- कोरेगाव पार्कमधील वाहतूक कोंडी कायम 
- फातिमानगर चौकातील उड्डाण पूल अथवा ग्रेड सेपरेटर 
- वस्ती भागातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्‍न 
- टिंबर मार्केट, भवानी पेठेतील रखडलेली रस्तारुंदी 
- टिंबर मार्केटचे मोठ्या जागेत स्थलांतर 

सरत्या कार्यकाळात मतदारसंघातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. घोरपडी, लुल्लानगरमधील उड्डाण पूल मार्गी लागला आहे, तर फातिमानगरमधील उड्डाण पुलासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातूनही अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. वस्ती विभागात समाजमंदिरे आणि विकासकामे महापालिकेच्या माध्यमातून केली आहेत. आता स्वारगेट-हपडसर मेट्रो मार्गासाठी पाठपुरावा सुरू आहे. पाण्याचाही प्रश्‍न मार्गी लावला आहे. 
- दिलीप कांबळे, विद्यमान आमदार

 या मतदारसंघाचे आमदार गेल्या पाच वर्षांपासून जनतेला उपलब्ध झालेले नाहीत. महापालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डाने केलेली विकासकामे हा आमदारांचा विषय नाही. आमदारांनी एकही विकास योजना केलेली नाही. झोपडपट्ट्यांचे प्रश्‍न कायम असून, एसआरए योजनाही रखडली आहे. कॅंटोन्मेंटमधील वाढीव एफएसआयचा प्रश्‍नही सुटलेला नाही. वाहतुकीची कोंडी कायम असून, बाजारपेठांतील प्रश्‍नही सुटलेले नाहीत. मध्यभागात तर पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. 
- रमेश बागवे कॉग्रेस
 

loading image
go to top