Dr. Narendra Dabholkar Case : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सरकारचे साक्षी पुरावे संपले

आरोपींचे जबाब नोंदविले जाणार असून त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील
Dr. Narendra Dabholkar
Dr. Narendra DabholkarSakal

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात बुधवारी (ता.१३) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) साक्षी पुरावे संपल्याबाबतचा अर्ज दाखल केला. त्यामुळे आता आरोपींचे जबाब नोंदविले जाणार असून त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील.

विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात हा अर्ज सादर करण्यात आला. डॉ. दाभोलकर यांची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि त्यानंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.

गुन्ह्यातील पाच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चिती करण्यात आली. आरोपींनी मात्र गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते.

आरोपींविरोधात तेरा पुरावे सीबीआयतर्फे न्यायालयात सादर करण्यात आलेले आहेत. घटनास्थळाचा पंचनामा, मृत्यूची कारणे, मृत्यूची वैद्यकीय सूचना, फॉरेन्सिक प्रयोगशाळांचे अहवाल, आरोपी संजीव पुनाळेकर यांच्या कार्यालयातून दोन लॅपटॉप जप्त केल्याचा आणि आरोपींच्या छायाचित्रांचा मेमो यासह १३ पुराव्यांचा त्यात समावेश आहे.

सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षी पुरावे संपल्याची माहिती सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून न्यायालयात दिली. खटल्याची पुढील सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com