खरीप हंगामात जुन्नरला सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा  

दत्ता म्हसकर
बुधवार, 4 जुलै 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नरला खरीप हंगामाच्या पेरणीच्या तोंडावर सोयाबीनच्या बियाण्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार सुमारे पाच हजार किलो सोयाबीन बियाणे सध्या कमी पडत आहे.यामुळे शेतकरी अन्य पिकाकडे वळण्याची शक्यता वाढली आहे. 

नव्याने पेरणी करण्यासाठी सोयाबीनचे बियाणेच गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. सोयाबीनच्या बियाणांची उपलब्धता तातडीने करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

भांडवली दृष्ट्या परवडणारे व समाधानकारक परतावा देणारे पीक म्हणून गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या उत्पादनाकडे तालुक्यातील शेतकरी वळला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जवळपास दुपटीने लागवडीत वाढ झाली. विदर्भातील बहुतांशी शेतकऱ्यांनी  देखील  कापूस पिकाऐवजी सोयाबीनला पसंती दिल्याने सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा जाणवत असल्याचे  बियाणे विक्रेते मिलिंद ताजणे यांनी सांगितले. सोयाबीन काढणीच्या अवस्थेत असतांना मागील वर्षी पाऊस झाल्याने बिजोत्पादन प्रक्रिया समाधानकारक झाली नसल्याने बियाणांचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगण्यात आले. 

जुन्नर तालुका खरेदी विक्री संघ, खासगी बियाणे विक्रेते यांच्याकडे देखील बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

Web Title: lack of soyabean seeds in junnar in kharip season