संशोधनासाठी हुशार विद्यार्थ्यांचा अभाव - डॉ. जयंत नारळीकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

विज्ञानकथा ही भयकथा नसावी, त्यात जादूचे प्रयोगही नसावेत. विज्ञानातील संकल्पना समजावून सांगण्यासाठी आवश्‍यक कथानक असावे. विज्ञानातील एखादी खुबी दाखवणारी ही कथा असावी.
- डॉ. जयंत नारळीकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

पुणे - ‘आम्ही ज्या काळात शिक्षण घेतले, तेव्हा देशात खगोलशास्त्रातील संशोधनाची सोय उपलब्ध नव्हती. आताची परिस्थिती चांगली असून उत्तम संसाधने उपलब्ध आहेत. मात्र आता संशोधनासाठी पुरेशा हुशार विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे,’’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात शुक्रवारी रामन मेमोरिअल कॉन्फरन्सला सुरुवात झाली, त्यातील मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विज्ञान लेखक प्रा. संजय ढोले यांनी ही मुलाखत घेतली. 

डॉ. नारळीकर म्हणाले, ‘‘देशामधील वैज्ञानिकांची एककल्ली संशोधन करण्याची पद्धत कमी झाली असून, एकत्रित संशोधनासाठी आता सर्व प्रयत्नशील आहेत.’’ डॉ. मंगला नारळीकर, सोलापूर विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, डॉ. अंजली क्षीरसागर आदी या वेळी उपस्थित होते. 

एल्गार परिषदेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय; पुढील सुनावणी पुण्यात नाही!

म्हणून ‘आयुका’ पुण्यात
१९८०च्या दशकात विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च संशोधनासाठी अणुऊर्जा, खगोलशास्त्र आदी केंद्रांची स्थापना करण्याचे ठरविले होते. माझ्याकडे खगोलशास्त्र केंद्राची जबाबदारी आली. पुणे विद्यापीठाशी माझे चांगले संबंध होते. तसेच, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे रेडिओ खगोलशास्त्रातील केंद्र विद्यापीठाच्या आवारात येणार होते. या दोनही संस्थांचा संशोधनाच्या दृष्टीने फायदा होईल म्हणून ‘आयुका’ची स्थापना पुण्यात करण्यात आली. 

‘पुलं आणि सुनीताताईं’ची केंब्रिज भेट
डॉ. नारळीकर केंब्रिज विद्यापीठामध्ये शिकत असताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे, सुनीताताई, आचार्य अत्रे आदींनी या विद्यापीठाला भेट दिली. डॉ. नारळीकरांनी त्यांना केंब्रिजची सफर घडवली. आचार्य अत्रे यांनी तर मराठामध्ये ‘आचार्य अत्रे नारळीकरांच्या तपोवनात’ हा लेखही लिहिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of talented students for research dr jayant narlikar