‘आम्ही जेन झी हे सहन करणार नाही’

‘आम्ही जेन झी हे सहन करणार नाही’
Published on

लडाखच्या डोंगररांगांवर असलेल्या एका तपासणी नाक्यावर काही तास थांबवण्यात आल्याने संतप्त झालेल्या एका तरुणीने सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये तरुणी वारंवार ‘आम्ही ‘जेन झी’ आहोत, हे सगळे सहन करणार नाही’, असे म्हणताना दिसत आहे. अशा प्रकारचे निर्बंध पूर्वी काश्मिरी नागरिकांवर लादले जात होते आणि आता बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही त्याचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही तिने केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त केली. समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेला हा व्हिडिओ लडाखमधील कारगिल परिसरातील मिनीमार्ग तपासणी नाक्यावरील असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com