
मंचर : ‘‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ काही शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून, दोषी कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करून शासकीय कोषागृहात भरली जाईल, तसेच त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होईल,’’ असा इशारा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे.