

Ladki Bahin Yojana
esakal
मुंबई : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेला ई-केवायसीच्या अडचणींमुळे ब्रेक लागला आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास, या योजनेचा लाभ थांबवला जाणार आहे. फक्त वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांनाच हा लाभ मिळेल. दरमहा १५०० रुपये थेट खात्यात जमा होण्याची ही योजना आहे, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आहे.