दारुड्या पतीच्या छळाला कंटाळली अन् उचलले नको ते पाऊल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

आरती अविनाश भोसले (वय 25, रा. दांडेकर पुल) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी दादाराव शिंदे (वय 55, रा.दांडेकर पुल) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : मद्यपी पतीकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहीतेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास दांडेकर पुल येथील वस्तीमध्ये घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरती अविनाश भोसले (वय 25, रा. दांडेकर पुल) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी दादाराव शिंदे (वय 55, रा.दांडेकर पुल) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अविनाश नंदू भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत. त्यापैकी मोठी मुलगी आरती हिचा अविनाश याच्याशी 2010 मध्ये विवाह झाला होता. आरती व अविनाश यांना आठ वर्षांचा मुलगा होता.

शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा मोदींशी तुलना; सोशल मीडियावर भडका

दरम्यान, पाच वर्षांपासून अविनाश यास दारूचे व्यसन लागले. तसेच त्याचे एका महिलेसमवेत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे तो आरती हिला शिवीगाळ व मारहाण करून तिचा छळ करीत होता. या प्रकाराविरुद्ध आरतीने दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. या प्रकाराबाबत आरती तिचे वडील , भाऊ व बहिणीस सांगत असे. त्यांच्याकडून दोघांचीही समजूत घालून आरतीला माघारी पाठविण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी (ता.17) आरती यांनी पतीच्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी यांनी घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना खबर दिली. त्यानंतर आरतीचा मृतदेह पाहीला. त्यावेळी तिला पतीने मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याचे निदर्शनास आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A lady committed suicide after being tired of alcoholic husband

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: