मुसळधार पावसामुळे थोरांदळे येथील पाझर तलाव फुटला अन्...

नवनाथ भेके
Sunday, 13 September 2020

थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील उपळीमळा येथील ओढयावरील पाझर तलाव मुसळधार पावसामुळे फुटला असल्याने अडवून राहणारे पाणी वाहून जात आहे.

निरगुडसर : थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील उपळीमळा येथील ओढयावरील पाझर तलाव मुसळधार पावसामुळे फुटला असल्याने अडवुन राहणारे पाणी वाहुन जात आहे. त्यामुळे परीसरातील २०० एकर क्षेञाला या वाहून जाणा-या पाण्याचा तोटा सहन करावा लागणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, त्यामुळे दुरुस्ती करावी तर कायमस्वरुपी याठिकाणी सिमेंटचा बंधारा उभारण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. थोरांदळे येथील उपळीमळ्यातील ओढयाचे खोलीकरण करण्यात आले होते. त्यामुळे पावसामुळे साचणा-या पाण्याचा लाभ परीसरातील दीड किमी अंतरावरील २०० एकरमधील शेतीला होत आहे.

या पाण्यामुळे विहीर व विंधनविहीरीत पाणी पातळी टिकून राहत असल्याने सभोवतालचा दीड किमी परीसर हिरवागार झाला आहे.सततच्या होणा-या पावसामुळे बंधारा पाण्याने तुटुंब भरला असुन तो फुटला आहे,सिमेंटचे पाईपही वाहुन गेले आहे त्यामुळे पाणीसाठयावर त्याचा परीणाम झाला आहे.

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

परीसरातील नागरीकांनी या बंधा-याच्या दुरुस्तीची मागणी करत याठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना म्हणुन सिमेंटचा बंधारा बांधावा अशी मागणी डॅा. दत्ता विश्वासराव, साईनाथ टेमगिरे, देवराम पोखरकर यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the lake burst at Thorandale

Tags
टॉपिकस
Topic Tags: