पुणे : बजाज शोरूमला भीषण आग; अग्निशाशमन दलांकडून आग आटोक्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

घोरपडी येथील भारत फोर्ज कंपनीजवळ असलेल्या लक्ष्मी बजाज शोरूमला बुधवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत चार रिक्षा आणि स्पेअर पार्ट जळून खाक झाल्या.

पुणे : घोरपडी येथील भारत फोर्ज कंपनीजवळ असलेल्या लक्ष्मी बजाज शोरूमला बुधवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत चार रिक्षा आणि स्पेअर पार्ट जळून खाक झाल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. भारत फोर्ज कंपनीच्या जवळ लक्ष्मी बजाज ऑटो रिक्षाचे शोरूम आहे. या शोरूममध्ये लागलेल्या आगीत चार रिक्षा आणि इतर स्पेअर पार्ट जळून मोठे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच भारत फोर्ज कंपनीची गाडी घटनास्थळी पोचली. या गाडीसह अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री साडेअकराच्या सुमारास आग आटोक्यात आणली.

खरंच, पाकिस्तानातील गैरमुस्लिमांची संख्या २३% वरुन ३.७%वर घसरली का?

अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख शिवाजी चव्हाण यांच्यासह गणेश पवार, दिपक चौरे, बापू आढळगे, बाळासाहेब कामठे, गिरजू मंडले या जवानांनी आग आटोक्यात आणली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakshmi Bajaj showroom burns spare part with four rickshaws in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: