लालूंवरील आरोपनिश्चिती आता ३० ऑक्टोबरला

लालूंवरील आरोपनिश्चिती आता ३० ऑक्टोबरला
Published on: 

लालूंवरील आरोपनिश्चिती
आता ३० ऑक्टोबरला

सकाळ न्यूज नेटवर्क
पाटणा, ता. ३ : ‘आयआरसीटीसी’ हॉटेल टेंडर गैरव्यवहारप्रकरणी शनिवारी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह अन्य आरोपी न्यायालयात हजर झाले. मात्र, आरोप निश्चित करण्याची औपचारिक प्रक्रिया शनिवारी पूर्ण होऊ शकली नाही. न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ३० ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे.
लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, रेल्वेच्या रांची आणि पुरी येथील दोन हॉटेलच्या संचालनाशी संबंधित निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली होती. त्याच्या मोबदल्यात पाटणा येथील जमीन हस्तांतरित करण्याशी संबंधित व्यवहार झाल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. राऊज अव्हेन्यू न्यायालयाने १० सप्टेंबर रोजी या प्रकरणातील १६ आरोपींपैकी नऊ जणांविरुद्ध पीएमएलएअंतर्गत आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. तर सात आरोपींना प्रकरणातून मुक्त करण्यात आले आहे. आरोप निश्चितीची औपचारिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तीन ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार लालूप्रसाद, राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांच्यासह अन्य आरोपी शनिवारी न्यायालयात हजर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com