वडिल दोन मुलांसह रात्री मेंढ्यांजवळ झोपले होते, अचानक बिबट्या प्रकटला... 

नवनाथ भेके
Wednesday, 21 October 2020

मुलगा अंबादास हा हल्ला झालेल्या ठिकाणापासून फक्त एक फुटावर होता. त्याचा पाय वाघराला लागूनच होता. सुदैवाने मोऱ्या कुञ्यामुळे आम्ही वाचलो...

निरगुडसर : पाऊस सुरु होता म्हणून छोटया बकऱ्यांसह आम्ही तिघा बाप लेकांनी संरक्षण म्हणून ताडपञी टाकली होती. छोटी बकरे वाघरात होती. रात्री आमच्या जवळ असलेल्या बक-यावर बिबटयाने हल्ला करुन ठार केले. त्यावेळी माझा मुलगा अंबादास हा हल्ला झालेल्या ठिकाणापासून फक्त एक फुटावर होता. त्याचा पाय वाघराला लागूनच होता. सुदैवाने मोऱ्या कुञ्यामुळे आम्ही वाचलो, ही प्रतिक्रिया आहे त्या दोन मुलांच्या वडील गजानन करगळ यांची.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, हा प्रकार आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील गोरडे मळ्यानजीक मंगळवार (ता. २०) रोजी मध्यराञी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडला. गेल्या तीस वर्षांपासून गजानन करगळ कुटुंब शिंगवे येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या तेथे असलेल्या जमीनीवरच त्यांचा उदनिर्वाह चालतो. बिबटयाच्या हल्ल्याने करगळ कुटुंब धास्तावले आहे.

बुधवारी राञी गोरडेमळा नजीक एका शेतावर त्यांचे वास्तव्य होते. तेथे पाऊस सुरु असल्याने मोठया मेंढया मोठया वाघरात होत्या तसेच छोटया मेंढयांसह करगळ कुटंबातील गजानन करगळ आपल्या आकाश व अंबादास या मुलांसह वास्तव्यास होते. ते तीघे जण व छोट्या २० बक-या सुरक्षित म्हणून छोटया वाघरात होत्या आणि काही फुटावर हे तिघेजण झोपले होते. त्यामध्ये अंबादास हा त्या बक-यांच्या जवळच झोपला होता. तसेच अंबादास याची आई व मोठी बहीण त्याच्या पासून काही अंतरावर झोपले होते. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चार राखणदार कुञी पण होती. सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास बिबटयाने हल्ला करुन दोन महीन्याचे कोकरु पकडले आणि हा प्रकार अंबादासच्या अवघ्या एक फुटावर घडला. कुटुंब जागे झाल्यावर सर्वांनी आरडाओरडा केला, तरी पण बिबटया त्यांच्यावर गुरकत होता. परंतु त्यांच्या सोबत असलेल्या राखणदार मोऱ्या कुत्र्याने हल्ला चढवला आणि बिबटयाला तेथून धुम ठोकावी लागली. वनविभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करगळ कुटुंबियाने केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोऱ्या कुत्र्यामुळे बिबटया पळाला...छोटया मेंढयांसह करगळ कुटंबातील गजानन करगळ आपल्या आकाश व अंबादास या मुलांसह झोपले होते. त्यावेळी त्यांचा राखणदार कुञा मोऱ्या पण तेथेच होता. ज्यावेळी बिबट्याचा हल्ला झाला त्यावेळी हे तिघे जण जागे झाले. त्यावेळी बिबटयाने या तिघांवर डरकाळी फोडली. परंतू त्यांच्य़ा कुञ्याने आक्रमण केल्याने बिबटयाने धूम ठोकली आणि या करगळ कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A lamb killed in a leopard attack

Tags
टॉपिकस
Topic Tags: