...हा दिवा उजेडा बरोबर आनंदही देतो

...हा दिवा उजेडा बरोबर आनंदही देतो

पुणे : ''नमस्कार सर, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. आम्ही दिवाळी निमित्त आकर्षक दिवे,आकाश कंदिल, मेणबत्त्या, पणत्या, जेली कॅन्डल, ज्यूट बॅग, भेट कार्ड अशा अनेक वस्तू बनविल्या आहेत. या सर्व वस्तू आम्ही स्वतः आमच्या हातांनी बनविल्या आहेत.'' अशी माहिती कल्पना खरात आणि सारिका पाटील या डोळ्याने अंध असलेल्या विद्यार्थीनी त्यांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री करताना देत होत्या.


कोथरुडच्या गांधीभवन जवळील 'दि पूना स्कूल अँड होम फॉर दि ब्लाईंड गर्ल्स ट्रेनिंग सेंटर' येथे या मुली व्यवसाय प्रशिक्षण घेत आहेत. येथे शिकणाऱ्या 25 मुली व काही माजी विद्यार्थीनी त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविले आहे. हे प्रदर्शन कोथरुड अंधशाळेच्या आवारात  26 ते 28 ऑक्टोबर या काळात सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत लावले जाणार आहे. या प्रदर्शनासाठी विविध वस्तू बनविण्यात मुली व्यस्त होत्या. त्यांनी बनविलेले दिवे विकत घेणारांच्या घरांमधील अंधकार दूर होवून प्रकाश पडेलच शिवाय त्यामुळे या दिव्यांग मुलींच्या जीवनातही आनंद फुलणार आहे. त्यामुळे एकप्रकारे हे दिवे उजेडा बरोबर आनंदही देणारे ठरले आहेत.

 ''दिव्यांग विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचे काम आम्ही 1979 सालापासून करत आहोत. येथे घेत असलेल्या कार्यशाळेत मुलींना शिवणकाम, हस्तकला, विणकाम, हातमाग, तसेच मसाज व बेसिक संगणकाचे सुध्दा प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या मुली स्वावलंबी बनत आहेत.''
- वर्षा रांका, मुख्याध्यापिका

''अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे ध्येय या विद्यार्थीनींनी समोर ठेवले आहे. यंदाच्या प्रदर्शनात माजी विद्यार्थीनींनी बनविलेल्या वस्तूही मांडण्यात येणार आहेत. या वस्तू अधिकाधिक ग्राहकांनी विकत घेतल्यास या मुलींसाठी तो फार मोठा पाठिंबा ठरणार आहे.''
- प्रिती पेठकर, प्रशासकीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com