भूसंपादनासाठीचे पॅकेज आठवडाभरात निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पुणे - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता उठल्यामुळे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपदानासाठीचे पॅकेज या आठवड्यात निश्‍चित केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाची बैठक होणार असून त्यामध्ये ‘पॅकेज’ ठरवले जाणार आहे.

राज्य सरकारकडून निश्‍चित करण्यात आलेल्या पुरंदर येथील विमानतळासाठी सुमारे बाराशे हेक्‍टरहून अधिक जागा लागणार आहे.

त्यापैकी खासगी जागा किती आणि सरकारी किती लागणार, याचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबतची निश्‍चित माहिती समोर येणार आहे. त्यानंतरच पॅकेजचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्य सरकारकडून या संदर्भात अर्थ विभागाशीही चर्चा झाली असून, पॅकेजचा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. पॅकेज जाहीर करतानाच विमानतळाचा सर्वंकष आराखडा तयार करण्यासाठीची निविदाही मागविण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे एकाच वेळी केली जाणार असल्याने विमानतळ उभारण्याच्या कामाला गती मिळेल, असे बोलले जात आहे.

शेतकऱ्यांना सर्वाधिक चांगले पॅकेज देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून समृद्धी कॅरिडॉर, हैदराबादची राजधानी अमरावती, नवी मुंबई येथील विमानतळ आदी ठिकाणच्या भूसंपादनासाठी वापरण्यात आलेल्या पॅकेजचा अभ्यास करण्यात आला आहे. विमानतळ प्राधिकरणाबरोबर लवकरच बैठक होणार असून, त्यात या संदर्भातील अहवाल मांडला जाईल. त्यावर चर्चा होऊन अंतिम पॅकेज तयार केले जाईल. राज्य सरकारची मान्यता घेतल्यानंतर ते पॅकेज शेतकऱ्यांसमोर मांडण्यात येणार आहे. आठवडाभरात हे पॅकेज तयार होणार आहे.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी

Web Title: land aquisition certain week package