

पुणे, ता. ६ ः क्रिसाला डेव्हलपर्सच्या वडगाव-लोणावळा ग्रोथ कॉरिडॉरमधील ६३ एकरांच्या ‘लँड ऑफ ड्रीम्स’ या प्लॉटेड डेव्हलपमेंट प्रकल्पासाठी ‘जमीन से रिश्ता’ ही नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे. अभिनेता, संगीतकार आणि गीतकार पीयूष मिश्रा यांच्या प्रमुख भूमिकेतील जाहिरातीद्वारे स्वतःच्या मालकीची जमीन असण्यामागील भावनिक नाते, स्वातंत्र्य आणि भविष्यातील शक्यतांचा वेध त्यात घेण्यात आला आहे.
कवितेच्या माध्यमातून कथाकथन करणाऱ्या या मोहिमेत जमीन ही केवळ गुंतवणुकीची मालमत्ता नसून, स्वप्ने, आठवणी आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षा आकाराला येण्याचे माध्यम असल्याचे मांडण्यात आले आहे. तयार घरापेक्षा वेगळे असलेल्या ‘लँड ऑफ ड्रीम्स’मध्ये ग्राहकांना आपल्या गरजा, जीवनशैली आणि कल्पनाशक्तीनुसार घर उभारण्याचे स्वातंत्र्य मिळते. या मोहिमेतील एक मिनिट ३४ सेकंदांच्या जाहिरातीत पीयूष मिश्रा यांनी भूमिका साकारली आहे. ‘‘प्लॉट ही पूर्ण झालेली गोष्ट नसते. त्यापासून आपल्याला काय साकारायचे आहे, हे ठरविण्याचे स्वातंत्र्य मिळते,’’ असे त्यांनी सांगितले.
क्रिसाला डेव्हलपर्सचे विपणनप्रमुख प्रतीक वाणी यांनी सांगितले की, प्रकल्पाला लाँचनंतर आतापर्यंत १५० हून अधिक बुकिंग मिळाली आहे. पारंपरिक रिअल इस्टेटच्या चर्चेपलीकडे जाऊन ग्राहकांचे जमिनीशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.
या प्रकल्पातील भूखंडांची सुरुवातीची किंमत ५४.९९ लाख रुपये असून, आगामी स्वामीनारायण मंदिराच्या परिसरातील जमीन ही या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.