मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर बोरघाटात दरड कोसळली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर बोरघाटात ठाकूरवाडी-मंकीहील दरम्यान बुधवारी (ता. 27) मध्यरात्री रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे.

लोणावळा : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर बोरघाटात ठाकूरवाडी-मंकीहील दरम्यान बुधवारी (ता. 27) मध्यरात्री रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे.

मोठ्या दरडींसह डोंगरावरील उंच झाडे, मातीचा ढिगारा, चिखल रेल्वेमार्गावर आल्याने डाऊन आणि मिडल लाईनला मोठी हानी पोचली आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यात रेल्वेच्या वतीने धोकादायक दरडी पाडण्यासाठी पंधरा दिवसांचा ब्लाॅक घेतल्याने पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या जवळपास वीस गाड्या एकतर रद्द केल्या आहेत किंवा त्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच हैराण झालेल्या प्रवाशांचे रेल्वे मार्गावर दरड पडल्याने अधिक हाल झाले आहे. यामध्ये घटनेत कसलीही जिवीतहानी झाली नसली तरी रेल्वे रुळांसह ओव्हरहेड वायरला हानी पोचल्याने रेल्वेच्या संकटात भर पडली आहे.

घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे आपत्कालिन पथक, वरिष्ठ अधिकारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले असून रात्रभऱ दुरुस्तीचे काम सुरु होते. घाट सेक्शनमध्ये पावसाची संततधार सुरुच असल्याने कामात अडथळे निर्माण होत आहेत. मात्र रेल्वेच्या सुत्रांनी रेल्वे वाहतुक सुरळीत करण्यास रेल्वेचे प्राधान्य असल्याचे सांगत सुरक्षेची खात्री झाल्यानंतर वाहतुक पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात येईल अशी माहीती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: landslide on railway root at Borghat mumbai pune expressway