पर्यटकांनी सिंहगडावर येणे टाळा, कारण... (व्हिडिओ)

Singhgad Fort
Singhgad Fort

पुणे (खडकवासला) : शनिवार, रविवार व  सोमवार अशा तीन दिवस सलग सुट्ट्या आहेत. हवामान खात्याने तीन- चार अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सिंहगडावर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. सध्या सिंहगड घाट रस्त्यात छोट्या-मोठ्या दरडी पडत आहेत. पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. म्हणून पर्यटकांनी जोराचा पाऊस असल्यानंतर सिंहगड खडकवासला धरण परिसरात येणे टाळावे. असे आवाहन हवेली पोलिस व भांबुर्डा वन विभागाने केले आहे. 

सिंहगड घाट रस्त्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता वाहनतळापासून खाली उतरताना 300 मीटर पडलेल्या दरड पडली होती. ते काम काढण्याचे काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते. घाट रस्त्या मागील आठवड्यात चार- पाच ठिकाणी दरडी पडल्या आहेत. रस्तातील दरड कडेला काढल्या होत्या. त्या दरडी तेथून हलविण्याचे काम दिवसभर सुरू होते. त्याठिकाणी, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी बाळासाहेब जीवडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जयंत काकडे, वन सरंक्षण समितीचे नितीन गोळे, रोहित पटेल तानाजी घाटके मंगेश गोफणे, बबन मरगळे पिंटू भोळे राजेंद्र बडदे स्थानिक ग्रामस्थ पंडित यादव, माऊली कोडीतकर, युवराज पायगुडे राजेंद्र चव्हाण, विक्रम भाडले येथे मदत करीत होते. 

जीवडे यांनी सांगितले, गुरुवारी दरड पडल्यानंतर शंभर ते दीडशे पर्यटक गडावर अडकले होते घाट रस्त्यातील काही दगड काढून एक वाहन जाण्यासाठी रस्ता केला आणि पर्यटकांची सुटला केली. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जयंत काकडे यांनी सांगितलले की, "दरडी प्रतिबंधक जाळ्या बसविण्याचे काम सध्या मुसळधार पावसामुळे थांबविले आहे. जाळ्या बसवण्यासाठी खडकाला होल(बोळ) पाडून त्याच लोखंडी गज बसवलेले आहेत. जाळ्या बसण्यापूर्वी पावसाला सुरुवात झाल्याने काम थांबवले. त्यासाठी एक कोटी 24 लाख रुपये निधी मंजूर झाला असून यामध्ये साठ मीटर लांब व बारा मीटर रुंद अशी जाळी बसवली जाणार आहे"

पर्यटक नागरिकांनी सहकार्य करावे
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे अनेक जिल्ह्यात महापुराची परिस्थिती आहे. दरडी पडत आहेत  गरज पडल्यास कोणत्याही वेळी सिंहगड बंद केला जाईल. त्यामुळे शिवप्रेमी, पर्यटक, प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक गडावरील खाद्यपदार्थ विक्रेते तसेच धरण चौपाटीवरील खाद्यपदार्थ विक्रेते यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. असे आव्हान भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार आणि हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com