सततच्या पावसामुळे तळमाचीवाडीत भूस्खलन

दत्ता म्हसकर
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जुन्नर : सततच्या पावसामुळे तळमाचीवाडी ता.जुन्नर येथील दौडया डोंगराच्या उतारावरील जंगलात जमिनीला भेगा पडल्या असून काही ठिकाणी भुस्खलन झाले असल्याची माहिती ग्रामस्थ बाळू तुकाराम साबळे यांनी दिली. गावाच्या पूर्वेला सुमारे एक हजार फूटावर या भेगा पडल्या असून भेगांची संख्या अधिक आहे तर डोंगरावरून वाहत येणाऱ्या दोन ओढ्याच्या मधील काही भूभाग कमरेइतका खचला आहे.

ही माती पाण्यात मिसळत असल्याने ओढ्याला गढूळ पाणी येत आहे. येथील पुनर्वसन रखडले आहे तर दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या कमी अधिक भेगा व जमीन खचण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. अशात घरांना ओली येऊ लागल्याचे सांगण्यात आले. भूजल सर्वेक्षण विभागाचा भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचा अहवाल आहे.

दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या गावात तळमाचीवाडीचा समावेश आहे. गेली तेरा वर्षे पावसाळ्यात ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहत आहेत मात्र पुनर्वसनाचा प्रश्न काही सुटत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र दरड कोसळण्याचा धोका नसल्याचा अभिप्राय दिला असल्याने गावास निधी देण्यात आला नाही यामुळे पुनर्वसनाचे काम रखडले आहे.अशा घटना घडल्यानंतर अधिकारी गावाला भेट देतात आपला अहवाल शासन दरबारी पाठवून देतात. प्रश्न मात्र तसाच कायम राहत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
 
Web Title: Landslide in talamchiwad due to continuous rains