पाऊस जास्त झाल्याने पश्चिम घाटात दरडी पडण्याचा धोका

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 8 जुलै 2018

या ठिकाणी मागील पाच दिवसांपासून या भागात 500 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पूर्वी या परिसरात एवढा पाऊस झाल्यावर या ठिकाणी दरडी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, या ठिकाणी ही धोक्याची सूचना म्हणून याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.

खडकवासला : मागील पाच दिवसांपासून घाट रस्त्यांच्या भागांमध्ये 350 ते 500 पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पुणे जिल्ह्यातील माथेरान, लोणावळा, कार्ला, याचबरोबर भिवंडी, महाबळेश्वर, अंबानी, वेल्हा, अम्बा, राधानगरी, आंबोली येथील घाट रस्त्यावरील दरडी पडणाऱ्या ठिकाणी अतिदक्षता घ्यावी. असे आवाहन सतर्क संस्थेच्यावतीने शनिवारी रात्री अकरा वाजता जाहीर केले आहे. 

या ठिकाणी मागील पाच दिवसांपासून या भागात 500 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पूर्वी या परिसरात एवढा पाऊस झाल्यावर या ठिकाणी दरडी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, या ठिकाणी ही धोक्याची सूचना म्हणून याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर, रायगड, ठाणे, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील घाटामध्ये मागील पाच दिवसात 350 मिलिमीटर पाऊस पडला आहे. या ठिकाणी पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढला 100 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्यावर या ठिकाणी देखील दरडी  पडण्याची शक्यता वर्तविली आहे. 

यातील बहुतांश सर्व भागात मागील पाच दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्याच बरोबर पुढील 8 व 9 जुलै हे दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे, नागरिक, पर्यटकांनी  घाटरस्ते, धबधबे या भागात जाणे टाळावे. आपत्ती व्यवस्थापन व सरकारी यंत्रणांनी याबाबत जागरूक रहावे. असे आवाहन असे मॉन्सून व दरडींचा अभ्यास करणाऱ्या सतर्क इंडिया या संस्थेच्या वतीने कळविले आहे. 

Web Title: landslide at western ghat due to heavy rain