अकाश कंदील, तोरण, उटणे बनविण्याच दिव्यांग विद्यार्थी दंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

ह़डपसर - अकाश कंदील, तोरण, लटकन, पॅाट, उटणे, सिरामिक पॅाट, पणत्या, सॉक्ट टॅायज आणि दीपावली भेटकार्ड अशा विविध वस्तू बनविण्यात वानवडी येथील अपंग कल्याणकारी शिक्षण संस्थेचील मुले मग्न आहेत. विशेष मुलांमधील कलागुणांना संधी देउन त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संस्थेची धडपड सुरू आहे. 

दिवाळी जवळ येत असल्याने शाळेतील मुलांनी बनविलेल्या वस्तूंना विविध कंपन्यातून मागणी येत आहे. त्यानुसार पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून शाळेचा अभ्यास सांभाळून या मुलांचे हात विविध कला कसुरीच्या वस्तू तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. मुलांना हस्तकला, शिवणकला, भरतकाम आणि चित्रकलेले शिक्षण शाळेत दिले जाते. संस्थेच्या शाळेत अनेक हितचिंतक वस्तू विकत घेतात. मुलांना कलेची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून ना नफा ना तोटा या तत्वावर मुलांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री केली जाते. मुलांनी बनविलेल्या वस्तु समाजापर्यंत पोचविण्यासाठी संधी मिळते. त्यामुळे वस्तू बनविताना मुलांना आनंद वाटतो असे संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. मुरलीधर कचरे संस्थेची माहिती देताना सांगितले. 

Web Title: lanterns, toran, ubtan made by handicap students