पटेल रुग्णालयात अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी सुविधा उपलब्ध : ब्रिगेडियर भूपेश गोयल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

laparoscopy facility available at Patel Hospital Brigadier Bhupesh Goyal

पटेल रुग्णालयात अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी सुविधा उपलब्ध : ब्रिगेडियर भूपेश गोयल

कॅन्टोन्मेंट : पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी युनिटची सुविधा उपलब्ध झाली आहे. लॅप्रोस्कोपी युनिटमुळे शल्यचिकित्सकांना दुर्बिणीद्वारे पोटातील अवयवांची तपासणी करणे सुलभ होणार असून, पोटाच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांना फायदा होणार असल्याचे कमांड हॉस्पिटलचे उपप्रमुख ब्रिगेडियर भूपेश गोयल यांनी एका उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी माहिती देताना सांगितले. तसेच या मशिनी मार्फत बऱ्याचशा स्त्रीया अगदी सोप्या रीतीने होतील. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना कमी कालावधीत लवकर बरे होता येईल. असे ही गोयल यांनी सांगितले.

खासदार गिरीश बापट यांच्या संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकासनिधीतून रुग्णालयाला मिळालेल्या 39 लाख रुपयांच्या निधी मार्फत लॅप्रोस्कोपी युनिट व रुग्णवाहिकेचे लोकार्पण ब्रिगेडिअर गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल, बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन मथुरावाला, रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा तपासे, डॉ. महेश दळवी, बोर्डाचे माजी सदस्य दिलीप गिरमकर, शैलेश बीडकर, डॉ. किरण मंत्री, महेश पुंडे, शशी पुरम आदी उपस्थित होते. यावेळी रुग्णांकरिता अतिशय महत्त्वाची व अत्यावश्यक सेवा दिल्याबद्दल खासदार गिरीश बापट यांचे सुब्रत पाल यांनी विशेष आभार मानले. याप्रसंगी सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. उदय भुजबळ यांनी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस, शस्त्रक्रिया आदी उपक्रमांची माहिती दिली.

Web Title: Laparoscopy Facility Available At Patel Hospital Brigadier Bhupesh Goyal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewspuneHospitalArmy